यपाल सी. विद्यासागर राव || मोगराळे घाटातील पोलिस मदत केंद्रच मदतीच्या प्रतीक्षेत || 17 क्रमांकाचा अर्ज भरण्यास 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ || गाव बादलायचा असेल तर स्वतपासून सुरुवात करा – अण्णा हजारे || धुळदेव विद्यालयाचे छत कोसळून शिक्षकासह विद्यार्थीनी जखमी || कर हा राज्याच्या विकासाचा पाया – डॉ. अभिनव देशमुख || सातारा सैनिकी शाळेत प्रवेशासाठी परीक्षा 12 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर कालावधी ऑनलाईन अर्ज करावेत

Serch



Thursday, 4 February 2016

निकोप लोकशाहीसाठी विधानपरिषद अत्यावश्यक- रामराजे नाईक निंबाळकर

नागपूर : विधानसभेत एखादा कायदा संमत झाल्यास त्यावर सर्वांगाने, पक्षनिरपेक्ष पद्धतीने आणि शांतपणे विचार करुन तो कायदा अधिक परिपक्व बनविण्यासाठी विधानपरिषदेचे सभागृह अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
विधानभवन येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत सुरु असलेल्या संसदीय अभ्यासवर्गात शुक्रवारी त्यांचे ‘द्वीसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्वपूर्ण योगदान’ या विषयावर व्याख्यान झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार ॲड. आशिष शेलार, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, अवर सचिव सुनिल झोरे यांच्यासह राज्यातील विविध 11 विद्यापीठांतील विद्यार्थी, अधिव्याख्याते उपस्थित होते.
श्री. नाईक-निंबाळकर म्हणाले, देशातील अनेक राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात नाही. पण महाराष्ट्र विधानमंडळात मात्र विधानपरिषद अस्तित्वात असून अनेक महत्वाचे कायदे संमत करण्यात तसेच कल्याणकारी राज्यासाठी विविध धोरणे आखण्यात या विधानपरिषदेने महत्वाची भूमिका बजावली आहे. विधानसभेत राजकीय हितसंबंध ठेवून एखादा कायदा रेटला जात असेल किंवा पक्षीय बहुमताच्या आधारे काही चुकीचे घडत असल्यास त्यावर अंकुश ठेवण्याचे महत्वाचे कार्य विधानपरिषदेच्या माध्यमातून होते. समाजातील तज्ज्ञ, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्वान आदींचे प्रतिनिधित्व असलेल्या या सभागृहात कायद्यांवर सखोल, तपशीलवार आणि सर्वांगाने चर्चा होऊन कायदा परिपक्व, निर्दोष आणि लोककल्याणकारी बनविण्यात महत्वाचे योगदान दिले जाते.
राज्यात विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये पूर्ण समन्वय आहे. या दोन सभागृहात संघर्ष निर्माण होणार नाही, एवढे राजकीय सामंजस्य आपल्या राज्यात निश्चितच आहे. किंबहुना विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते. निकोप लोकशाहीच्या दृष्टीने विधानपरिषद अत्यंत महत्वाचे आहे. चर्चा, विचारविनिमय हा संसदीय लोकशाही प्रणालीचा आत्मा आहे, असेही त्यांनी सांगितले.
सभापती श्री. नाईक-निंबाळकर यांच्या व्याख्यानानंतर या संसदीय अभ्यासवर्गाचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी श्री. नाईक-निंबाळकर यांच्यासह विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थी आणि अधिव्याख्यात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिव्याख्याता प्रा. रवींद्र पाटील यांनी आभार मानले.

0 comments:

Post a Comment